राहुल गांधींनी डॉ. आंबेडकरांची माफी मागावी - उपाध्ये
मुंबई : भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी कधी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली का, असा सवाल केला.
उपाध्ये यांनी भाजपाच्या शिवकालीन वारसा जतन करण्याच्या कामगिरीचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याचे, शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणल्याचे आणि शिवस्मारकासाठी निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसवर टीका करताना त्यांनी राहुल गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी अशी मागणी केली. तसेच लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतल्याचा आरोप केला.
महाविकास आघाडीला पराभव दिसू लागल्याने त्यांचे ताळतंत्र सुटले असल्याचे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांवर टीका केली. कार्यक्रमास भाजपा केंद्रीय माध्यम समन्वयक के.के. उपाध्याय आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: