देवरी, गोंदिया (प्रतिनिधी): विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी महायुती सरकारला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आमगांव-देवरी मतदारसंघात भाजपा-महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
फडणवीस यांनी पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी, किसान सन्मान निधी १२ हजारांवरून १५ हजार रुपये करणे आणि लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकारच्या साथीने राज्य सरकारने आदिवासी बांधवांसाठी बिरसा मुंडा योजना, जनमन योजना, मोदी आवास योजना, शबरी, रमाई योजना यांसारख्या अनेक योजना राबवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय, महाज्योती योजना, ५२ वसतिगृहे आणि परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनांचाही उल्लेख केला.
सभेला मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, आमदार परिणय फुके, देवराव होळी आदी मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०७:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: