पिंपळे सौदागरमधील सोसायट्यांकडून जगतापांना पाठिंबा
पिंपळे सौदागर (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी पिंपळे सौदागर भागातील पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवून परिसराला अधिक स्मार्ट बनवण्याचे आश्वासन दिले आहे.
स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू असलेले शंकर जगताप यांनी परिसरातील विविध सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाणी, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक नाना काटे, भाजप कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेशम, सेलेनिओ, शुभम, यास्मिन, मयुरेश्वर आदी अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांनी जगताप यांना पाठिंबा दर्शवला.
स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या पिंपळे सौदागरच्या विकासाला अधिक गती देण्याचे आणि चिंचवड विधानसभेत सर्वत्र विकासाचा वटवृक्ष वाढवण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले.
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०७:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: