ओएनजीसी उरणतर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथे भोजनदान



उरण : ओएनजीसी उरणच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी, नागपूर येथे सलग १४व्या वर्षी भोजन दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात २६,००० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात अजनी जंक्शन रेल्वे स्थानकासमोरील स्टॉलवर एका औपचारिक मेळाव्याने झाली. यात ओएनजीसीचे अधिकारी, स्थानिक मान्यवर आणि समाजातील विविध घटक सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सुमारे १,५०० किलो नाश्ता आणि ४,५०० किलो जेवण वाटप करण्यात आले. ओएनजीसीच्या या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अन्नदानाच्या माध्यमातून समाजात एकता आणि सहानुभूती यांचे संवर्धन करणे.

कार्यक्रमात ओएनजीसी उरणचे हेड सामग्री व्यवस्थापन एन अशोक बाबू, ओएनजीसी मेहसाणाचे हेड वित्त विभाग धीरज उमरेडकर, ओएनजीसी उरणचे एचआर मॅनेजर गौरव पतंगे, एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विष्णु व्हटकर, सेक्रेटरी निशिकांत वलादे, तसेच सीइसी सदस्य विश्वास लोखंडे हे उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओएनजीसी उरणचे प्लांट हेड देवेंद्र कुमार त्रिवेदी, एचआर हेड श्रीमती भावना आठवले, वित्त विभागाचे प्रमुख मनीष मेहता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गौतम कदम आणि ३० हून अधिक ओएनजीसी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ओएनजीसीच्या या उपक्रमामुळे अनेक गोरगरीब भाविकांनी पोटभर जेवण मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ओएनजीसी उरणतर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथे भोजनदान  ओएनजीसी उरणतर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथे भोजनदान Reviewed by ANN news network on १०/१३/२०२४ ०८:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".