पिंपरी : - राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील तीन विद्यार्थी खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथे १० व ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय विभागस्तरीय वुशू स्पर्धेत या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी एकूण तीन सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक पटकावले. १९ वर्षाखालील गटात ६५ किलो वजनी गटात ओम जाधव, ४८ किलो वजनी गटात ऋतुजा मार्के आणि ६० किलो वजनी गटात अनुराधा फुगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे या तिघांची २५ ते २८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इतर यशस्वी खेळाडूंमध्ये ७२ किलो वजनी गटात ओम माटे (द्वितीय), ५२ किलो वजनी गटात रेहान शेख (द्वितीय) आणि ४५ किलो वजनी गटात किरण अपकारी (तृतीय) यांचा समावेश आहे.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी खेळाडूंना विशेष मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे इतर पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापक वृंदांनीही खेळाडूंचे कौतुक केले.
Reviewed by ANN news network
on
१०/१३/२०२४ ०८:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: