पुण्यात व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये कार्यालय
पुणे (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने श्री. मनवेश सिंग सिद्धू यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी आज दिली.
श्री. सिद्धू यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन नामनिर्देशन प्रक्रियेच्या स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
निवडणूक निरीक्षक सिद्धू यांचे कार्यालय व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, ए-३०६, पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांना त्यांची भेट सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घेता येईल. संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक (९१८८९१०५५६) आणि दूरध्वनी क्रमांक (०२०-२९५१४८८६) उपलब्ध आहे.
निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री. मुकुंद पवार (मोबाईल क्र. ८००७२००५८५) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी निरीक्षकांच्या भेटीसाठी निर्धारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने केले आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०१:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: