छंदाचे रूपांतर ध्यासात व्हावे : डॉ. श्रीकांत केळकर
पुणे: डॉ.मेहरा श्रीखंडे लिखित 'अॅन अनपॅलेटेबल ट्रूथ' या इंग्रजी पुस्तकाचे आणि 'एक न पटणारे सत्य ' या मराठी अनुवादाचे प्रकाशन दि.१३ ऑक्टोबर रोजी हॉटेल लेमन ट्री ( पुणे स्टेशन जवळ ) येथे सकाळी साडेदहा वाजता झाले. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मोलॉजी' चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.अरुणा केळकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले .या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक शिंदे यांनी केला आहे.
डॉ.श्रीकांत केळकर म्हणाले,'पुण्याला आकाश निरीक्षणापासून अवकाश संशोधनापर्यंत मोठी परंपरा आहे.आकाश पाहणे हा अनेकांचा छंद असला तरी त्या पलीकडे आकाशातील रहस्य समजून घेणे सोपे नाही. छंदाचे रूपांतर ध्यासात झाल्याशिवाय अशी निर्मिती होऊ शकत नाही.हा अवघड विषय असून त्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक संग्राह्य आहे. शालेय स्तरापर्यंत हे पुस्तक पोचले पाहिजे'.
मेहेरा श्रीखंडे यांनी लेखनामागील प्रेरणा सांगितल्या.त्या म्हणाल्या,' आपल्या जगाच्या पलीकडे काय आहे याबद्दल कुतूहल 'एक न पटणारे सत्य' पुस्तकातून पुढे येते.बरम्युडा ट्रांगल, समुद्रखालील भूकंप, यूएफओ,सॉसर,परग्रहीय गूढ घटनांचा आणि अज्ञात क्षेत्रांचा शोध घेण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.रॉसवेलच्या गूढ घटना ते प्राचीन इजिप्तचे रहस्य, हे पुस्तक आकर्षक कथा आणि तपशीलवार संशोधनांनी भरलेले आहे, ज्यामुळे सर्व ज्ञात गोष्टींवर प्रश्न निर्माण होतात. अनुभवी यूएफओ प्रेमी किंवा फक्त अज्ञाताबद्दल उत्सुक असणाऱ्या वाचकांचा दृष्टिकोन हे पुस्तक बदलेल.कल्पनाशक्ती प्रज्वलित करेल,असा विश्वास लेखिका डॉ.मेहरा श्रीखंडे यांनी व्यक्त केला.
अशोक शिंदे म्हणाले,' अंतराळविश्वाची भ्रमंती हा विषय मराठीत फारसा हाताळला जात नाही. शास्त्रीय विषय सामान्य वाचकांना समजेल असे लिहिले गेले पाहिजेत. परग्रहावरील जीवसृष्टी बद्दल कुतूहल शमले पाहिजे.पृथ्वीवरील अनेक स्थापत्य रचनामागील प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लागलेला नाही.पुढील पिढी कदाचित ही रहस्ये उलगडून दाखवेल.
सौ.अरुणा केळकर यांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या. प्रकाशक स्नेहल शिंदे,दिलीप कामत, श्री.पुनावाला,आय एम मर्चंट,जगदीश श्रीखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कुलसूम खान यांनीही मनोगत व्यक्त केले. हे पुस्तक अमेझॉन किंडलवर उपलब्ध आहे.
पुस्तक प्रकाशनप्रसंगी डावीकडून अशोक शिंदे, डॉ.मेहरा श्रीखंडे, सौ. अरुणा केळकर, डॉ. श्रीकांत केळकर, जगदीश श्रीखंडे
Reviewed by ANN news network
on
१०/१३/२०२४ ०३:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: