पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गुरुवारी राबवलेल्या मोठ्या तिकीट तपासणी मोहिमेत एका दिवसात १.१८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम रेल्वे वापरकर्त्यांना सुरक्षित, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर मंडल रेल प्रबंधक श्री बृजेश कुमार सिंह तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या निर्देशनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावर ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान, विना तिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या ४१० प्रवाशांकडून आणि बुक न केलेल्या सामानाकडून १.१८ लाख रुपये वसूल करण्यात आले.
विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) श्री एच.के. बेहेरा यांनी या तपासणीचे निरीक्षण केले. तपासणी दरम्यान ३५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि २ आर.पी.एफ. कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सर्व प्रवेश-निर्गम द्वारे आणि महत्त्वाच्या ठिकाणी तिकीट तपासणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध प्रवास तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि तिकीट क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना दंडात्मक शुल्क टाळण्यासाठी वैध प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्याची विनंती केली आहे.
या यशस्वी मोहिमेमुळे रेल्वे प्रशासनाचा नियमांचे पालन करण्याचा संदेश प्रवाशांपर्यंत पोहोचला असून, भविष्यात अशा मोहिमा वारंवार राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/१२/२०२४ ०४:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: