भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील एका लिपिकाला १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई भिवंडी शहरात करण्यात आली.
आरोपीचे नाव अजय सिताराम गायकवाड (४२) असे आहे. ते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेली घरपट्टी तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी श्री. गायकवाड यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली.
१९ सप्टेंबर रोजी एसीबीने पडताळणी केली असता, श्री. गायकवाड यांनी तक्रारदाराकडे प्रथम १० हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित १० हजार रुपये अशी मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि श्री. गायकवाड यांना १० हजार रुपये स्वीकारताना पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. गजानन राठोड आणि श्री. महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२४ ०८:१०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: