सर्व सूक्ष्मजीव घातक नसतात ! : डॉ. प्रगती अभ्यंकर

 


पर्यावरण व्याख्यानमालेतील व्याख्यान 

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणारी 'जीविधा' ही संस्था तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा  बायोडायव्हर्सिटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण व्याख्यानमालेतील दुसऱ्या दिवशी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी  डॉ. प्रगती अभ्यंकर यांचे 'ओळख सूक्ष्मजीव जगताची ' या विषयावर  व्याख्यान झाले . या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला .

'स्मॉल इज ब्युटीफुल' या विषयावरील ही व्याख्यानमाला दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान दृकश्राव्य सभागृह,गरवारे महाविद्यालय (कर्वे रस्ता) येथे रोज होत आहे.व्याख्यानमालेची वेळ रोज सायंकाळी ६.३० ते ८ अशी असणार आहे.व्याख्यानमालेचे १६ वे वर्ष असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

डॉ . अभ्यंकर यांनी आजच्या व्याख्याना त  सूक्ष्मजीवांची माहिती दिली . त्या म्हणाल्या,' नुसत्या डोळयांनी सूक्ष्मजीव दिसत नाहीत. स्टेनिंग ( रंगद्रव्य) वापरून सूक्ष्म दर्शिकेत दिसतात .

सतराव्या शतकात सूक्ष्मजीव अभ्यासाची सुरवात झाली . आता सूक्ष्मजीवशास्त्र ही विज्ञानाची स्वतंत्र शाखा आहे . सूक्ष्मजीवांमध्ये भरपूर वैविध्य आहे . त्यात जिवाणू विषाणू शैवाल बुरशी प्रोटोजोआ यांचा समावेश आहे . आपले दैनंदिन जीवन हे सूक्ष्मजीवांच्या अवतीभवती विणलेले आहे . चांगल्या वाईट दोन्ही प्रकारातून आपले अस्तित्व दाखवून देत असतात . सजीव सृष्टी व पर्यावरण दोन्हीसाठी सूक्ष्मजीवांचे अपार महत्व आहे .सूक्ष्मजीव हे किण्वन प्रक्रिया घडवून आणतात .  १९ व्या शतकात विषाणू शास्त्राची ( व्हायरॉलॉजी)ची सुरवात झाली . जीवाणू पेक्षा सूक्ष्म असणाऱ्या या गोष्टीला विषाणू( व्हायरस) नाव देण्यात आले .पुढे निर्जंतुकीकरण महत्वाचे झाले . जंतुविरहित शस्त्रक्रिया संकल्पना मानवजातीसाठी वरदान ठरली .   प्रतिजैविकांचे शोध लावल्यावर मानवजातीचे आरोग्य सुधारले .

      सर्व सूक्ष्मजीव धोकादायक नसतात . शरीरातील पेशीपेक्षा ज्यास्त सूक्ष्मजीव मानवी शरीरात असतात .शेती समृद्ध करणारे सूक्ष्मजीव आहेत, रासायनिक खते वापरून आपणच ते नष्ट करत चाललो आहोत . लॅक्टीक अॅसिड बॅक्टेरिया सारखे सूक्ष्मजीव लाभदायक आहेत . अँटीबायोटिक औषधे घेताना दूध , दही, ताक सेवन हितकारक ठरते . पाश्चराईज केलेले ब्रँडेड दही शक्यतो सेवन करू नये, घरचे विरजण आरोग्यवर्धक ठरते .

'जीविधा' संस्थेच्या वृंदा पंडित यांनी  स्वागत केले .

आगामी व्याख्याने

बुधवार , 25 सप्टेंबर 2024 रोजी 

'सौंदर्य छोट्या कीटकांचे ' विषयावर

 नुतन कर्णिक यांचे व्याख्यान होणार आहे .

 गुरुवार , 26 सप्टेंबर रोजी

'परागीकरणात कीटकांची भूमिका ' विषयावर ईशान पहाडे यांचे व्याख्यान होणार आहे .

शुक्रवार , 27 सप्टेंबर रोजी 

'चला करूया फुलपाखरांशी ओळख' विषयावर  रजत जोशी यांचे व्याख्यान होणार आहे .

 शनिवार , 28 सप्टेंबर रोजी

'सुक्ष्मांचे छायाचित्रीकरण ' विषयावर सुधिर सावंत यांचे व्याख्यान होणार आहे .

  निसर्ग साखळीत सर्व सजीव जातींचे महत्व एकसारखे असते.दुर्दैवाने लहान आकाराच्या सजीवांकडे सजगतेने पाहिले जात नाही.'जीविधा' व गरवारे महाविद्यालयाच्या बायोडायव्हर्सिटी विभागतर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत छोट्या आकाराच्या जीवसृष्टीची माहिती तज्ज्ञांकडून ऐकण्याची संधी  मिळेल.


सर्व सूक्ष्मजीव घातक नसतात ! : डॉ. प्रगती अभ्यंकर सर्व सूक्ष्मजीव घातक नसतात ! : डॉ. प्रगती अभ्यंकर Reviewed by ANN news network on ९/२५/२०२४ ०८:१०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".