निळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई !



 महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवनामुळा व इंद्रायणी या तीन नद्यांच्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बांधकामापैकी अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेकडून मंगळवारदिनांक २४ सप्टेंबर रोजीपासून कारवाई सुरु करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्वप्रथम अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई सुरु केली असून मंगळवारी महापालिकेच्या बइ क्षेत्रीय कार्यालयामधील तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात आली. यापुढे संपुर्ण बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महापालिकेच्या ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन  अंदाजे ५५०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. सदर  कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान कारवाईसाठी उपस्थित होते. त्यासोबतच कारवाईसाठी २ जेसीबी वापरण्यात आले. ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ११ अनधिकृत वीटबांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,००० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे.  याकारवाईसाठी क्षेत्रीय अधिकारी३ अतिक्रमण अधीक्षक८ बीटनिरीक्षक१० पोलीस कर्मचारी व १५  मजूर उपस्थित होते. याकारवाईसाठी २ जेसीबी,  १ ट्रॅक्टर ब्रेकर अशी यंत्रणा उपस्थित होती. याचबरोबर, ‘’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये१० अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन  अंदाजे १६,४०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. यासाठी ४ क्षेत्रीय अधिकारी१ अतिक्रमण अधीक्षक६ बीटनिरीक्षक३० पोलीस कर्मचारी व १५  मजूर त्याबरोबरयाकारवाईसाठी २ जेसीबीची यंत्रणा वापरण्यात आली.

निळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई ! निळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई ! Reviewed by ANN news network on ९/२५/२०२४ ०८:२०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".