निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भयभीत करण्याचे राजकारण थांबवा : खासदार श्रीरंग बारणे

 


पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केलीत्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? - बारणे


पिंपरी : मुळापवनाइंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामेघरेदुकाने पाडण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. यास नागरिकांकडून विरोध केला जात आहे. पूररेषेत बांधकामे होत असताना महापालिका प्रशासनाने डोळेझाक केली. त्याची शिक्षा आता सर्वसामान्य गरिबांना काअसा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या चुकीमुळे वाढलेली अनधिकृत बांधकामे पाडू दिली जाणार नाहीतअशी जाहीर भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली आहे.

शहरातील तीनही नद्यांच्या पूररेषेतील बांधकामे हटविण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात बाधित नागरिकांनी पूर संरक्षण समिती स्थापन केली. या समितीची सांगवीत बैठक झाली. त्यापूर्वी बाधित रहिवासी व समितीने जुनी सांगवीतील संगमनगर चौकात, 'आमची घरे पाडली तर आम्ही तुमचे सरकार पाडूअशा आशयाचा फलक लावून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्रप्रशासन कारवाईवर ठाम आहे. महापालिकेने सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवले आहे.

निळी पूररेषा व रस्ता रुंदीकरण यामुळे बाधित बांधकामांना यापूर्वीच भूसंपादन विभागाने नोटीस बजावल्या आहेत. नागरिकांच्या सूचना व हरकतींवर सुनावणी झाली आहे. प्रशासनाच्या निर्णयाची सर्वाधिक झळ जुनी सांगवीत मुळा नदी किनारा भागातील बाधितांना तसेच पवना नदी काठावरील पिंपरीकाळेवाडी भागातील रहिवाशांना बसणार आहे. याचबरोबर रस्ता रुंदीकरणाचाही फटका त्यांना बसणार आहे. तसेचसांगवी- बोपोडी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. सुशोभीकरणानंतर पूल रहदारीसाठी खुला होईल. तेव्हा मुळा नदी किनारा रस्ता रुंद करावा लागणार आहे. त्याची भीती नागरिकांना सतावत आहे.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "निळ्या पूररेषेत सुमारे दोन लाख घरे आहेत. या नागरिकांना उघड्यावर येऊ देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना भयभीत करण्याचे राजकारण पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन करत आहे. पूररेषेत बांधकामे होत असताना प्रशासनाने डोळेझाक केली. आता त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना कापूररेषेतील बांधकामे पाडू दिली जाणार नाहीत. ज्या अधिकाऱ्यांनी पूररेषेतील बांधकामांकडे दुर्लक्ष केलेत्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली आहेअसा सवाल देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भयभीत करण्याचे राजकारण थांबवा : खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भयभीत करण्याचे राजकारण थांबवा :  खासदार श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on ९/२५/२०२४ ०८:२५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".