पिंपरी : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, पिंपरी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेत दुहेरी विजेतेपद पटकावले आहे. १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवत कॉलेजने हा लक्षणीय विजय साजरा केला.
मुलांच्या गटातील कामगिरी
मुलांच्या अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ कॉलेजच्या संघाने डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज पिंपरी या संघाला ३-२ गुणांनी पराभूत केले. उपांत्य फेरीत त्यांनी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आकुर्डी चा ६-५ गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
मुलींच्या गटातील कामगिरी
मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर पिंपरी या संघाचा १५-१४ गुणांनी पराभव केला. अंतिम सामन्यात त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज पिंपरी या संघाला ३-२ गुणांनी मात देत विजेतेपद पटकावले.
विजयी संघातील खेळाडू
मुलांचा संघ:
कु. गणेश काळेल, प्रज्वल पवार, कृष्णा गिरी, रियाज शेख, परवेज शेख, आदित्य तरकसे, कल्याण साबळे, ओम जाधव, आर्य गव्हाणे, ओम शेटे, साहिल घावरी, सोहम होले, यश बर्गे, अजय नाथजोगी, स्वराज लांडगे, राहुल ढगे.
मुलींचा संघ:
सिद्धी राणे, पूजा जाधव, अनुराधा फुगे, ऋतुजा मार्के, नागीन बेलपाडे, आदिती थिटे, ज्ञानेश्वरी हाके, दुर्गा केंद्रे, मानसी रेंगडे, श्रावणी मोरजकर, तृप्ती बोरकर, आदिती कडूसकर, वैभवी चित्ते, शाही हरिकला, रिद्धेश्वरी आढाव, सुनिता कामी.
दोन्ही संघांची निवड सोलापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद सदाशिव करंडे यांनी या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन केले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, खजिनदार अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: