पुणे : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २९ व ३० ऑगस्ट रोजी मनपा शाळा कासारवाडी येथे आयोजित या स्पर्धेत, कॉलेजच्या खेळाडूंनी १९ व १७ वर्षे वयोगटात ईपी, फॉईल आणि सॅबर या तीनही क्रीडा प्रकारांत सांघिक प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील ठळक कामगिरी
१७ वर्षे वयोगट (मुली)
- **ईपी**: कु. नितिका देब (११ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक
- **फॉईल**: कु. वैभवी चित्ते (११ वी विज्ञान) व कु. समृद्धी धुमाळ (१२ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक
१९ वर्षांखालील वयोगट (मुली)
- **सॅबर**: कु. रिद्धेश्वरी आढाव (१२ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक
- **ईपी**: कु. तृप्ती बोरकर, कु. ज्ञानेश्वरी हाके, कु. ऋतुजा मार्के (सर्व १२ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक
- **फॉईल**: कु. रिद्धेश्वरी आढाव व कु. तृप्ती बोरकर (दोन्ही १२ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक
१९ वर्षांखालील वयोगट (मुले)
- **ईपी**: कु. किरण अपकारी (११ वी कला), कु. ओमकार रमेश जाधव (१२ वी वाणिज्य), कु. कल्याण साबळे (१२ वी कला) - प्रथम क्रमांक
- **फॉईल**: कु. ओम दिलीप जाधव, कु. ओमकार रमेश जाधव (दोन्ही १२ वी वाणिज्य), कु. किरण अपकारी (११ वी कला) - प्रथम क्रमांक
- **सॅबर**: कु. ओम जाधव (१२ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक
या सर्व विजेत्या खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन केले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, खजिनदार अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: