विठ्ठल ममताबादे
उरण : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याचा दुर्घटनेचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संस्था संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. विविध राजकीय पक्षानेही निषेध केला त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)तर्फे राज्यात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला.सदर घटनेचा उरण तालुक्यातही निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उरण तालुकाध्यक्ष कुंदा वैजनाथ ठाकूर व माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी उरण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सानप यांना निवेदन देऊन मालवणीतील राजकोट किल्ल्यावरचे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचा घटनेचा निषेध केला.
या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषीवर त्वरित कायदेशीर करावी व राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व शक्तिशाली पुतळा उभारण्यात यावे अशी मागणी कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांनी निवेदनद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
मालवण राजकोट येथील घटनेचा उरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२४ ०८:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: