पुणे : अतिवृष्टीमुळे पुणे शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपने तातडीने मदत केंद्रे आणि हेल्पलाइन सुरू केली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पुणेकरांना मदतीसाठी भाजपच्या कार्यालयांसह खासदार आणि आमदारांची कार्यालये 24 तास खुली राहतील.
मदतीसाठी नागरिकांनी 9066515656 किंवा 9928814646 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मदत केंद्रांमध्ये भाजपचे तीन हजार कार्यकर्ते पूरस्थिती नियंत्रित आणण्यासाठी कार्यरत आहेत. पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवणे, प्रथमोपचार, निवास, चहा, नाश्ता, आणि भोजन यांसारख्या आवश्यक सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आणि इतर पदाधिकारी यांसह बैठकीत भाग घेतले. मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, प्रशासनाच्या संपर्कात राहून पूरस्थितीचे नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी नालेसफाईची कामे नीट झालेली नसल्याचे सांगून प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवणे, औषधे, धान्य, चहा, नाश्ता, भोजन, पाण्याचे टँकर, कपडे, आणि निवास व्यवस्था यांसारख्या सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: