गांधीदर्शन शिबीराला चांगला प्रतिसाद

 


स्त्री-मुक्ती चळवळीला गांधीजींची प्रेरणा : अ‍ॅड.निशा शिवूरकर 


पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित  'गांधी दर्शन' शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.   रविवार, दि. १४ जुलै   २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत 'गांधी दर्शन' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले. ,एड.निशा शिवूरकर  (महात्मा गांधी आणि स्त्री -पुरुष समानता),डॉ.विश्वंभर चौधरी (लोकसभा निवडणूक प्रचारातील अनुभव ),डॉ. कुमार सप्तर्षी( महात्मा गांधी आणि तत्कालीन सशस्त्र चळवळ ) या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या विश्वस्त सिसिलिया कार्व्हालो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ' 'गांधी दर्शन' विषयावरचे हे बारावे शिबीर होते. 

  अन्वर राजन, साधना दधीच,डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ.मच्छिंद्र गोरडे,सुदर्शन चखाले,एड.स्वप्नील तोंडे , नितिन सोनवणे,आप्पा अनारसे, रोहन गायकवाड , लावण्या तोंडे आदी उपस्थित होते. जपान मधून आलेल्या बौद्ध भंते यांनीही संबोधित केले.सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

अॅड. निशा शिवूरकर म्हणाल्या, 'गांधी विचाराचे आश्रम आणि कार्य महाराष्ट्रात आहेत. गांधीजी हे देखील समतेच्या विचारांची प्रेरणा आहे.गांधीजींमुळें स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत आल्या. त्याहीपुढे स्त्री मुक्तीच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे.धर्मग्रंथांच्या निर्मितीत स्त्रीयांचा सहभाग नाही, मात्र, त्यांच्या अंमलबजावणीची सक्ती मात्र त्यांच्यावर टाकण्यात आली. हे म.फुले आणि म. गांधीजी या दोघांनीही म्हटलेले आहे.गांधीजींनी स्त्रियांना अबला मानत नाहीत. त्यांनी स्त्रियांचा प्रश्न उपेक्षितांच्या प्रश्नाशी जोडला.समतेचे टोक गाठायचे असेल तर लिंगभेद, वर्णभेद यांच्या पलीकडे जाऊन भेदाभेद मिटवले पाहिजेत.गांधीजींनी स्त्रियांमध्ये चैतन्य निर्माण केले, कारण स्त्रियांचे प्रश्न गांधी जी सर्वंकषपणे पाहत होते.माझा यज्ञ स्त्रियांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे, असे ते म्हणत. स्त्रियांना सर्वत्र भिऊन वागावे लागते, या भयापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असे गांधीजी मानत. सत्याग्रही निर्भय स्त्री अशी ओळख स्वातंत्र्यलढयात मिळाली.देश स्वतंत्र करणे आणि  स्त्रियांची दास्यातून सुटका करणे हे एकाच वेळी करण्याचे काम आहे, याविषयी  गांधीजींच्या मनात शंका नाही.आज मात्र, चंगळवाद वाढत असून वास्तवापासून, समस्यांपासून दूर नेत आहे, असेही निरीक्षण अॅड. शिवूरकर यांनी मांडले.लग्नाचे वय, विवाह, साधी विवाह पध्दती, आंतरजातीय विवाह याबाबत गांधीजींच्या प्रागतिक मतांची माहितीही त्यांनी दिली.नवरा बायकोे तील मैत्र भाव ही गांधींनी जगाला दिलेली देणगी आहे.आज प्रतिगामी विचारांच्या प्रभावाने  स्त्रियांवर अत्याचार होताना दिसत आहेत.अशावेळी पुन्हा गांधीजींच्या महिला सक्षमीकरणाच्या विचारांचे जागरण केले पाहिजे', असेही त्यांनी सांगितले .

सिसिलिया कार्व्हालो म्हणाल्या,' अभिजन आणि बहुजन संघर्षात गांधीजींनी नेहमी बहुजनांची बाजू घेतली आहे.मूल वाढविणाऱ्या स्त्रिया अहिंसेच्या विरोधात आहेत, असे गांधीजी म्हणत असत. त्यामुळे जगातील विविध देशातील स्त्रिया गांधीजींच्या अनुयायी झाल्या. येत्या काळात गांधीजींचा विचार जगाला दिशा देईल'.डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,'गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होवून  जगभर विविध देशात गांधीवादी नेतृत्व उभे राहिले.या नेत्यांनी मानवतेची चळवळ पुढे नेली.'
गांधीदर्शन शिबीराला चांगला प्रतिसाद गांधीदर्शन शिबीराला चांगला प्रतिसाद Reviewed by ANN news network on ७/१४/२०२४ ०४:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".