चिंचवडमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत अटकेत; दोन पिस्तुले जप्त!



साथीदारासही अटक, दोन पिस्तुले हस्तगत!!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडगावातील बसस्टॉपजवळ पिस्तूलविक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट २ ने नुकतीच अटक केली.त्यानंतर त्याच्या  साथीदारालाही राजगुरुनगर, खेड येथून अटक करण्यात आली आहे.

दुर्गेश बापू शिंदे, वय ३७ वर्षे रा. सरस्वती कॉलनी श्रीरामपूर जि. अहमदनगर असे या सराईताचे नाव असून त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ राऊंड जप्त करण्यात आले आहेत. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा साथीदार प्रवीण ऊर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ रा. राजगुरुनगर खेड यालाही पोलिसांनी अटक केली असून तो देखील सराईत गुन्हेगार आहे.त्याच्याकडूनही २ पिस्तुले आणि २ राऊंड जप्त करण्यात आले आहेत.

आरोपी दुर्गेश शिंदे हा मध्यप्रदेशच्या सीमा भागातून गावठी पिस्तुले आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना विकत असतो.चिंचवड पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्रमांक २६१/२०२३ मध्ये पोलिसांना तो हवा होता.त्याचा साथीदार प्रवीण ओव्हाळ याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने शिरुर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर आपल्या साथीदारांसह दरोडा घातला होता. तसेच घोडेगाव परिसरातील कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

या सराईत गुन्हेगारांना अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,  उपनिरीक्षक गणेश माने, श्रेणी उपनिरीक्षक केराप्पा माने, हवालदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, नाईक देवा राऊत, आतीश कुडके यांनी केली

चिंचवडमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत अटकेत; दोन पिस्तुले जप्त!  चिंचवडमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत अटकेत; दोन पिस्तुले जप्त! Reviewed by ANN news network on ७/०५/२०२४ ०५:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".