पुणे : पुणे शहरात झिका व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरू लागला असून त्यामध्ये ५ गर्भवती महिलांचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
यापूर्वी एरंडवण्यात चार रुग्ण आढळले होते. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रेवस्तीत दोन रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रुक, कर्वेनगर आणि खराडी परिसरातही रुग्ण आढळले आहेत. शहरातील रुग्णांचा आकडा ११ झाला आहे.
डास चावल्यामुळे झिका व्हायरसचा संसर्ग पसरत असल्याने नागरिकांनी डासांपासून स्वतःचा बचाव करावा. डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पुण्यात वाढला 'झिका'चा धोका! ११ जणांना संसर्ग
Reviewed by ANN news network
on
७/०८/२०२४ ०१:१०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/०८/२०२४ ०१:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: