शेतात कामाला येत नसल्याने कोयत्याने वार केले; मग, कारखाली चिरडून जीव घेतला!...



पुणे : पुण्यानजिकच्या खडकवासला परिसरातील मांडवी बुद्रुक गावातील एका शेतकर्‍याने आणि त्याच्या पुतण्याने आपल्याकडे शेतात कामावर येत नसल्याने शेतमजुरावर कोयत्याने वार केले. मजुराची पत्नी त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांना कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतमजुराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत मजूर रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मूळचा रहिवासी असून तो पोट भरण्यासाठी मांडवी बुद्रुक परिसरात मजुरी करत होता.  

भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय 55, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याची पत्नी अनुसया वाल्हेकर हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय हिंदुराव पायगुडे (वय 50, रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली) आणि सचिन नथु पायगुडे (वय 45, रा. मांडवी बुद्रुक) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून संजय पायगुडे याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाल्हेकर दाम्पत्य मागील ५ ते ६ वर्षांपासून मांडवी बुद्रुक येथे विलास पायगुडे याच्याकडे कामास होते.ते पायगुडे याच्या खोलीत रहात होते.हा प्रकार घडण्यापूर्वी तीन चार दिवसांपासून ते पायगुडे यांच्या शेतात कामाला न जाता अन्य शेतकर्‍यांच्या शेतात कामाला जात होते. दि. ३ जुलै रोजी आरोपी सचिन याने या संदर्भात वाल्हेकर दाम्पत्याला हटकले. त्यांना शिवीगाळ केली. आणि भरत वाल्हेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.त्यावेळी वाल्हेकर याची पत्नी अनुसया मध्ये पडली असता तिलाही सचिन वाल्हेकर याने मारहाण केली.

३ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अनुसया वाल्हेकर आपल्या गंभीर जखमी पतीला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन निघाली असता आरोपी सचिन याने या दाम्पत्याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या मुळे वाल्हेकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, ससूनच्या डॉक्टरांनी भरत वाल्हेकर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची खबर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अनुसया वाल्हेकर यांच्या जबाबावरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला, आणि संजय पायगुडे याला अटक केली.

शेतात कामाला येत नसल्याने कोयत्याने वार केले; मग, कारखाली चिरडून जीव घेतला!...  शेतात कामाला येत नसल्याने कोयत्याने वार केले; मग, कारखाली चिरडून जीव घेतला!... Reviewed by ANN news network on ७/०८/२०२४ ०२:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".