पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या अभिवादन रॅलीचे आयोजन आज आयोजन करण्यात आले होते.
पुणे महापालिकेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला प्रारंभ झाला.
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे राघवेंद्र बाप्पू मानकर,वर्षा ताई तापकीर,नगरसेवक प्रसन्न दादा जगताप, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, आदित्य माळवे, संदीप काळे, निवेदिता एकबोटे, राजेश येनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा फुले पुतळा, पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, समता भुमी - फुलेवाडा ( गंज पेठ), अण्णा भाऊ साठे - अहिल्यादेवी होळकर- स्वा. विनायक सावरकर यांचा पुतळा ( सारसबाग ), श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, भिडे वाडा, केसरीवाडा- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुतळा, मोतीबाग- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय या स्थळांना भेटी देऊन अभिवादन केले. भाजपा पुणे शहर कार्यालयात समारोप झाला.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने मला विधान परिषदेत आमदार म्हणून जी संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो. पुणेकरांचे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा विश्वास मी व्यक्त करतो.
घाटे म्हणाले, टिळेकर यांच्या रूपाने पुणेकरांना आणखी एक युवा आमदार मिळाला आहे. ते अभ्यासू असून आक्रमकपणे पुणेकरांचे प्रश्न सोडवू शकतील. महायुतीने सर्व ९ जागा जिंकल्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. आमच्या साठी हा शुभ संदेश असून, विधानसभा निवडणुकीत या विजयाची पूनार्वृत्ती करू याचा विश्वास वाटतो. मी पुणे शहर भाजपच्या वतीने टिळेकर यांचे अभिनंदन करतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: