भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसले ??

 



जम्मू : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्धाच्या छायेत आहे, असं धक्कादायक विधान पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसले आहेत.

कारगीलप्रमाणे युद्धाची शक्यता

डॉ. मिर्झा यांच्या मते, पाकिस्तानचे एसएसजी (स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप) कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराच्या हद्दीत प्रवेश करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मेजर जनरल अदिल रेहमानी यांच्या नेतृत्वाखालील ही तुकडी जम्मूच्या दिशेने हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

हे घुसखोरी पाकिस्तानी लष्कराच्या 600 कमांडोंद्वारे केली जात आहे.

जिहादी स्लिपर सेल्सची मदत

कुपवाडा आणि इतर भागात पाकिस्तानी एसएसजी कमांडोंना मदत करण्यासाठी स्थानिक जिहादी स्लिपर सेल्स सक्रिय झाले आहेत. मिर्झा यांनी असा दावा केला आहे की, लेफ्टनंट कर्नल शाहीद सलीम जिंजूआ भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैनिकांचे नेतृत्व करत आहेत आणि भारतीय लष्कराच्या 15 कॉर्प्सचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिक तुकड्यांची तयारी

मिर्झा यांच्या मते, मुझफराबादमध्ये एसएसजीच्या आणखी दोन तुकड्या सज्ज आहेत, ज्यांचा उद्देश भारतीय भूभागात घुसखोरी करणे आहे. त्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये यापूर्वी 40 ते 60 दहशतवादी घुसले होते, परंतु आता 500 ते 600 सैनिकांची मोठी तुकडी घुसली आहे आणि भारतीय लष्करावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे.

या दाव्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने यावर काय उत्तर देणार आणि परिस्थिती कशी हाताळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसले ?? भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसले ?? Reviewed by ANN news network on ७/२९/२०२४ ०१:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".