आरोग्याच्या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज : चंद्रकांतदादा पाटील

 


मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण

पुणे : सकस अन्नधान्याचा पुरवठा, आजाराचे वेळेवर निदान करणारी सुविधा आणि आजार झाल्यास किफायतशीर दरातील उत्तम उपचार या आरोग्याच्या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण करताना पाटील बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, विश्वस्त प्रकाश साहू, एमएनजीएलच्या संचालिका बागेश्री मंथाळकर, माजी आमदार दीपक पायगुडे, डॉ. संदीप बुटाला, सचिन पाषाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, महिलांमधील स्तनांच्या कॅन्सरचे निदान वेळेवर झाल्यास तो बरा होण्याची शक्यता अधिक असते. परंतु स्वभाव आणि भीतीमुळे महिला तपासणी करत नाहीत. त्यांच्यासाठी घराजवळ जाऊन तपासणी करणारी ही मेडिकल व्हॅन उपयुक्त ठरेल. त्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

पांडे म्हणाले, एक वर्षांपूर्वी पहिली व्हॅन सुरू करण्यात आली, त्याद्वारे 47 हजारांहून अधिक तपासण्या करण्यात आल्या. स्तनाचा कर्करोग, छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी, रक्तातील साखर, रक्तदान, नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप आणि दंतचिकित्सा अशा दहा हजार किंमतीच्या चाचण्या विनामूल्य केल्या जाणार आहेत. स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा.

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या (एमएनजीएल) सामाजिक दायित्व निधीतून या उपक्रमाला सहाय्य मिळाले आहे. सरोज पांडे, राहूल पाखरे, सुनील पांडे आणि वैदेही काळे यांनी संयोजन केले.

आरोग्याच्या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज : चंद्रकांतदादा पाटील आरोग्याच्या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज : चंद्रकांतदादा पाटील Reviewed by ANN news network on ६/०१/२०२४ ०७:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".