दोन कारना स्कॉर्पिओने धडक देत घटनास्थळावरून पसार!!
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे १ जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तळेगाव स्टेशन परिसरात तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकार्यांच्या स्कॉर्पिओने भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कारना धडक दिली. यावेळी स्कॉर्पिओ न थांबता घटनास्थळावरून पसार झाली. यानंतर तेथे जमलेल्या काही नागरिकांनी स्कॉर्पिओमध्ये मुख्याधिकारी होते आणि ते शुद्धीत दिसत नव्हते असे म्हटले असून मुख्याधिकार्यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे समजते.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शनिवार १ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास स्टेशन परिसरात काका हलवाई दुकानासमोर पोलो कार क्रमांक MH 14 CX 3660 आणि ब्रिझा कार क्रमांक MH 14 GS 2404 या दोन कार उभ्या होत्या. तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील स्कॉर्पिओ क्रमांक MH 13 EC 9633 घेऊन तेथे आले. त्यांची गाडी भरधाव होती स्कॉर्पिओने पोलो आणि ब्रिझा या कारना जोराने धडक दिली. वास्तविक अपघातानंतर पाटील यांनी तेथे थांबणे अपेक्षित होते. मात्र, ते गाडी न थांबवता पळून गेले. या प्रकार पाहणार्या काही नागरिकांनी पाटील मद्यधुंद अवस्थेत होते असे म्हटल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांच्या पथकाने पाटील यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेले आहे. पाटील यांची स्कॉर्पिओ त्यांच्या राहत्या घराखाली उभी होती. तिच्या बंपरवर डाव्या बाजूस अपघातामुळे पत्रा वाकला असून वाहनाला अपघात झाल्याचे दिसत आहे.
पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: