नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६२.४ कोटी मतदारांनी मतदान केले. त्यातील ३१.२ महिला आहेत. हा एक विश्वविक्रम आहे अशी माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ३ जून रोजी दिली.
मतमोजणीच्या आधी एक दिवस आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, हा एक ऐतिहासिक विक्रम आहे्ई संख्या जी ७ राष्ट्रांतील अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा या देशाच्या मतदारांच्या संख्येच्या दीडपट आहे. आणि युरोपियन युनियनच्या २७ काऊंटींच्या मतदारसंख्येच्या अडीचपट आहे. या निवडणूक प्रक्रियेत ६८ हजारांहून अधिक निरीक्षण पथके, दीड कोटी मतदान आणि सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते.
चार लाख वाहने, १३५ रेल्वेगाड्या आणि १ हजार ६९२ विमान उड्डाणे यांचा वापर या निवडणुकीसाठी करण्यात आला. निवडणूक काळात १० हजार कोटी रुपये जप्त करण्यात आले.
आचारसंहिताभंगाच्या ४९५ प्रमुख तक्रारी आल्या. त्यातील ९० टक्के निकाली काढण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: