देशभरातील हातमाग,वीणकामगारांच्या कलेचे प्रदर्शन सुरु
पुणे : देशभरातील नावाजलेल्या हातमाग आणि वीण कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली,कार्पेटचा समावेश असलेले 'दस्तकारी हाट एक्स्पो' हे प्रदर्शन हर्षल बँकवेट हॉल(कर्वे रस्ता) मध्ये दि. ५ जून रोजी सुरु झाले आहे. हे प्रदर्शन ११ जून, २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत असेल.
आकर्षक कलाकुसरीच्या साड्या,ड्रेस,सूट,कुर्ती,शाल आणि कलाकुसरीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असून खास उन्हाळ्यासाठी आणि लग्नसराईसाठी कपडे प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
टसर,आरी सिल्क,मर्सिलीन(भागलपूर),कातण, मुंगा,ऑर्गनझा,टिस्यु(बनारस,उत् तर प्रदेश),बांधणी,ब्लॉक प्रिंट(राजस्थान),कांठा वर्क,जामदानी ,कडवा (कोलकाता),अजरक,शिबोरी (गुजरात),चंदेरी(मध्य प्रदेश),मुंगा,टसर,हॅन्ड प्रिंटेड(आसाम),सिल्क कार्पेट,सिल्क प्रिंटेड साडी (काश्मीर) हे खास आकर्षण आहे.लग्नसराई साठी आणि इव्हेन्ट साठी खरेदीवर आकर्षक सवलत देण्यात येत आहे.
सिल्क साड्या,चंदेरी फॅब्रिक,मुगा सिल्क,कोसा सिल्क, कलमकारी साड्या,बनारसी सिल्क साड्या,कुर्ती,बेड शिट,कार्पेट उपलब्ध करून देण्यात आला आहे.विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.प्रदर्शन स्थळ पूर्णपणे वातानुकूलित आहे.
कोथरुड मध्ये 'दस्तकारी हाट '
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२४ ०८:४८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: