शिबिराचे आयोजन
पुणे : रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब (सहकारनगर) आणि 'लायन्स राहतेकर वूमन कॅन्सर डायग्नॉस् टिक सेंटर'(एल आर सी सी) यांच्यातर्फे स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबीर रविवार,दि.९ जून २०२४ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट,गिरे भेळ शेजारी,मामलेदार कचेरी समोर(शिवाजी रस्ता) येथे आयोजित करण्यात आले आहे . तरुण लेखक तुषार मालानी हे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.प्रमुख उपस्थिती राजेंद्र भट्टड यांची असणार आहे.'रक्ताचे नाते ट्रस्ट 'चे अध्यक्ष राम बांगड यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
श्री मुरलीधर महिला मंडळ,महात्मा फुले मंडळ यांचाही सक्रिय सहभाग या शिबीर आयोजनात असणार आहे. 'महिलांमधील कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने वेळीच तपासणी करून घ्यावी.दर पंधरा दिवसांनी असे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. महिलांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी', असे आवाहन राम बांगड,चंद्रकला बांगड,अवंतिका सोनावणे यांनी केले आहे.
९ जून रोजी 'रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट' तर्फे महिलांची मोफत कर्करोग तपासणी
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२४ ०८:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: