राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम अभिनेता इंद्रनचा 'जॅक्सन बाजार' येतोय आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
मुंबई : छोटीशी गावं, खेडी, त्यांच्या सौंदर्याला आणि शांत रूपाला घेऊन सर्वांनाच कुतूहल असतं. मात्र गावात घडणाऱ्या गंभीर घटना कोणाच्याही लक्षात येत नाहीत. अशाच एका गावात घडणाऱ्या एका गंभीर घटणाची गडद बाजू दाखवणाऱ्या ‘जॅक्सन बाजार’ या चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ७ जून २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारा ज्येष्ठ अभिनेता इंद्रन सदर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे.
चित्रपटाची कथा जॅक्सन बाजारात राहणाऱ्या एका बॅंन्ड वाजवणाऱ्या मित्रांभोवती फिरते. स्वप्नांचा पाठलाग करणारे हे मित्र नकळत एका गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या जाळ्यात अडकतात. त्यांना जमिनीच्या वादावरून त्यांची मैत्री, त्यांचा बॅंन्ड आणि त्यांचे जीवन नष्ट करण्याच्या धमक्या मिळू लागतात. चित्रपटात या छोट्या पण सर्वांच्या परिचयाच्या अडचणींचा सामना कसा रंगतो ते पहायला मिळणार आहे.
“चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात वाहणारे चित्रपट भव्य दिव्य असतात. मात्र त्यातला विषय आणि आशय कितपत प्रेक्षकांच्या पचनी पडतो हा प्रश्नच आहे. मात्र जेव्हा सामान्य आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या समस्येवर बोलणारा ‘जॅक्सन बाजार’ सारखा चित्रपट येतो तेव्हा प्रेक्षकांना नक्कीच भावतो यात कणभरही शंका नाही” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: