विठ्ठल ममताबादे
उरण : श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक नुरा शेख यांचा सेवापूर्ती कार्यक्रम जासई येथे महाविद्यालयात मोठया उत्साहात झाला.
भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी उरण तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते. रयत बॅकेचे संचालक व वाशी बॅकेचे चेअरमन किशोर पाटील, नितीन ठाकूर, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, आदी मान्यवरांनी नुरा शेखना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.
जेष्ठ शिक्षक नुरा शेख सेवानिवृत्त
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२४ ०८:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: