चन्न बस्वानंद स्वामी यांची गांधी भवनला भेट
बसवेश्वर आणि गांधीजींचे विचार परस्परपुरक
पुणे:: बिदर (कर्नाटक ) येथील चन्न बस्वानंद स्वामी आणि ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बसवकुमार पाटील यांनी आज महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन) ला भेट दिली आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वामी चेन्न बस्वानंद यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या 'ज्योती यात्रे'चे स्वागत यावेळी गांधी भवन - युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळी झालेल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय परिषदेची तपशीलवार माहिती स्वामी आणि श्री. पाटील यांनी दिली.
चन्न बस्वानंद स्वामी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची,बसव कल्याण येथील उपक्रमांची माहिती दिली. जात - पात न मानता समानतेचे विचार बसवण्णांनी पुढे आणले. लोकशाही परंपरेची सुरुवात देखील येथून झाली, असे त्यांनी सांगितले.महात्मा बसवेश्वर आणि गांधीजींचे विचार मानवतावादी आणि परस्पर पुरक आहेत,या विचारांनी पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा निर्धार यावेळी झालेल्या करण्यात आला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव आणि युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदिप बर्वे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात गांधी भवन आणि युवक क्रांती दलाच्या उपक्रमाची माहिती दिली.
पर्यावरण तज्ञ आणि युक्रांदीय डॉ. प्रवीण सप्तर्षी, गांधीवादी कार्यकर्ता रमा सप्तर्षी, विश्वयात्री नितीन सोनवणे, जीवित नदी या पर्यावरणवादी संघटनेचे कार्यकर्ते अमितराज देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
'ज्योतीयात्रे'चे गांधीभवन येथे स्वागत
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२४ ०८:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: