भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित 'मुसाफिर-एक अनवट शोध' या दृकश्राव्य कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.भारतीय राग संगीत शिकण्याच्या ओढीने भारतात आलेल्या आणि येत असलेल्या परदेशी कलाकारांच्या मुलाखतींवर हा कार्यक्रम आधारित होता.संशोधन आणि संहिता वंदना अत्रे यांची होती. त्यांच्यासमवेत डॉ.चंद्रकांत संकलेचा यांनी अभिवाचन केले.
भविष्याची अजिबात हमी नसताना वेगळ्या सांस्कृतिक आणि संस्कृती असलेल्या देशात येऊन संगीत साधना करणाऱ्या पाच विविध देशांतून भारतात आलेल्या पाच संगीत साधकांची, मुशाफिरांची ओळख या कार्यक्रमात वंदना अत्रे यांनी करून दिली.
जपान येथील ताकाहिरो अराई -संतूर वादन, इटली येथून आलेल्या इलेना सिटारिस्टी ओडीशी नृत्यांगना, जर्मनीतून आलेले कस्टर्न विके -रुद्रवीणा वादक, अमेरिकेतून आलेले जस्टीन मकारथी भरतनाट्यम नृत्य तसेच नेदरलँड्स येथील सासकीय हास यांच्या सेलो वादन अशा मुशाफिरीचा परिचय उपस्थितांना झाला.
हा कार्यक्रम शनिवार,दि.२२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.रसिकांना तो विनामूल्य खुला होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१४ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२४ ०१:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: