संविधान अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद

पुणे : युवक क्रांती दल , भारत जोडो अभियान आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने आयोजित 'संविधान अभ्यास वर्गाला आज चांगला प्रतिसाद मिळाला.

 शनिवार,दि.२२ जून २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कॉन्फरन्स हॉल,एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह,पुणे येथे या संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये 'लोकसभा सभापती : महत्व आणि अधिकार ' या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.भारत जोडो अभियान चे दत्तात्रय जाधव यांनी प्रा. कोल्हे यांचा सत्कार केला.

'हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला होता.   युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे  यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित हा दहावा संविधान अभ्यास वर्ग होता. एड.राजीव देशपांडे, राहुल भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रा.कोल्हे म्हणाले,'आधुनिक काळात लोकशाहीत सभापतीचे महत्त्व आलेले आहे. अध्यक्षीय लोकशाहीत सभापतीला महत्व नाही, संसदीय लोकशाहीत हे पद महत्वाचे आहे.लोकशाहीचे सर्व कामकाज, चर्चा संसदेत होत असल्याने संसदेचे सभागृह आणि सभागृहातील सभापती महत्वाचा ठरतो.ते संचालन व्यवस्थित व्हावे यासाठी सभापतीला अधिकार दिले आहेत.हे कामकाज निःपक्षपाती व्हावे, अशी अपेक्षा असते.पक्षांतर, मनी बिल अशावेळी सभापतींची भूमिका महत्वाची असते.१९९२ पर्यंत सभापतींचे निर्णय अंतिम होते. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जावू लागले.सभापती विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या प्रक्रियेची माहितीही त्यांनी दिली.

संविधान अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद  संविधान अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद Reviewed by ANN news network on ६/२३/२०२४ ०१:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".