भावना घाणेकर यांचा आंदोलनाचा इशारा
विठ्ठल ममताबादे
उरण : पावसाळा सुरू होताच उरण तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयात कॉल केला तर तो उचलला जात नाही किंवा रिसीव्हर बाजूस काढून ठेवला असल्यामुळे सतत एंगेज येत राहतो या त्रासाला नागरिक कंटाळले आहेत.
या प्रकरणी त्वरित लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला महिला प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, पनवेलच्या विभागीय प्रमुख भावना घाणेकर यांनी प्रधान सचिव (मुंबई मंत्रालय), उर्जामंत्री (मुंबई मंत्रालय),जिल्हाधिकारी अलिबाग रायगड, उपायुक्त परिमंडळ झोन २, तहसिलदार उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उरण, मुख्य अभियंता महावितरण उरण, महाराष्ट्र विद्युत मंडळ उरण यांच्याकडे केली आहे.
वीज पुरवठा अखंडित करण्यात यावा, नागरिकांच्या समस्या त्यांना कळविण्यात याव्यात यासाठी तात्काळ हेल्पहेल्पसुरू करण्यात यावी अशी मागणी घाणेकर यांनी केली केली आहे. वेळीच योग्य ती उपाय योजना झाली नाही तर आंदोलन उभारण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर व रायगड जिल्हा सरचिटणीस गणेश नलावडे यांनी दिला आहे.
ग्राहकांची समस्या लक्षात घेउन ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू. सदर समस्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेले आहेत.नागरिकांच्या समस्यांची योग्य ती दखल घेतली जाईल.- सिंहाजीराव गायकवाड, अधीक्षक अभियंता वाशी, नवी मुंबई
उरण तालुक्यात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२४ ०३:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: