मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांचा मोठा वाटा : श्रीरंग बारणे



पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार


चिंचवड :  राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची खासदारकीची हॅटट्रिक झाली याचे सर्व श्रेय सर्वसामान्य व सूज्ञ मतदारांना जाते, असे उद्गार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले. निवडणुकीत प्रचंड मेहनत घेणारे शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा आपल्या विजयामध्ये मोठा वाटा असल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांच्या वतीने फुलांनी सजवलेला मोठा धनुष्यबाण देऊन मोठ्या जल्लोषात बारणे यांना गौरविण्यात आले. खासदार बारणे व शिवसेनेच्या जयघोषात शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख नीलेश तरस, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शैला  पाचपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, महिला शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेविका विमल जगताप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे,खंडूशेठ चिंचवडे, दिलीप पांढारकर,युवतीसेना उपजिल्हाप्रमुख सायली साळवे, युवती सेना शहर प्रमुख रितू कांबळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर,तळेगांव शहर प्रमुख मुन्ना मोरे,देहूरोड शहरप्रमुख दीपक चौगुले, चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, युवासेना शहर संघटक निलेश हाके, युवासेना शहर प्रमुख माऊली जगताप, चिंचवड विधानसभा युवासेना प्रमुख मंदार येळवंडे, पिंपरी युवासेना प्रमुख सागर पुंडे, उपशहर प्रमुख दीपक वाल्हेकर, प्रदीप दळवी, सय्यद पटेल,सागर लांगे,सुदर्शन देसले,मनीष श्रीवास्तव,ॲड. मुकुंद ओव्हाळ, महिला चिंचवड विधानसभा सांघटिका शारदा वाघमोडे युवतीसेना चिंचवड सांघटिका श्वेता कापसे, कविता शिंदे, मंगल माने, मृणाली वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बारणे म्हणाले की, आपण गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे, नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क तसेच शिवसैनिक आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत यामुळे मतदारांनी आपल्याला सलग तिसऱ्यांदा निवडून देऊन देशातील सर्वोच्च अशा संसदेत पाठवले आहे. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. पिंपरी-चिंचवडकरांनी मोठे मताधिक्य दिल्यामुळे आपला विजय सोपा झाला पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांचे बारणे यांनी विशेष आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीए सरकार केंद्रात सत्तेवर आले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारही चांगले काम करीत आहे. मावळ मतदारसंघात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यासाठी यापुढेही आपण पाठपुरावा करू आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू, असे बारणे यांनी सांगितले.  

मागील गोष्टी उगाळत बसण्याऐवजी शिवसैनिकांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे. असे आवाहन बारणे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेत्रदीपक यश संपादन करून नवा इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या भाषणातून  खासदार बारणे यांचे अभिनंदन केले. 
मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांचा मोठा वाटा : श्रीरंग बारणे मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांचा मोठा वाटा :  श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on ६/१६/२०२४ ०१:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".