पुणे: ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी आपले बंधू स्वर्गीय रघुनाथ केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंडियन मेडिकल असोसिएशन,पुणे यांना विस्तार कार्यासाठी पस्तीस लाख रुपयांची देणगी आज दिली. या वेळी सौ.अरूणा केळकर तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.अविनाश भूतकर, डॉ.जयंत नवरंगे, डॉ.संजय पाटील, डॉ.अजय संचेती,डॉ. विरेंद्र ओस्तवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. अविनाश भूतकर व डॉ. राजन संचेती यांच्या हस्ते डॉ.श्रीकांत केळकर व सौ. अरूणा केळकर यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. केळकर यांचे कुटुंबीय व मित्र आप्तेष्ट मित्रपरिवार,स्वर्गीय रघुनाथ केळकर यांच्या पत्नी सुजाता केळकर, चिरंजीव सत्यजित केळकर, पत्नी संगीता सत्यजित केळकर, विवेक साठे, हेमचंद्र श्रोत्री, विकास आपटे, डॉ.वैजयंती खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अविनाश भूतकर म्हणाले की " डॉ केळकर हे अतिशय जिद्दी व्यक्तीमत्व असून, त्यांच्याकडून जिद्द, चिकाटी हे प्रत्येकाने शिकण्यासारखे गुण आहेत. डॉ. केळकर हे जेवढे जिद्दी तितकेच दानशूरही आहेत. त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इमारत बांधकामासाठी त्याकाळी पंधरा लाख रुपये देणगी दिली होती."
डॉ. जयंत नवरंगे म्हणाले की "डॉ. केळकर यांचे रुग्णालय हे प्रथम पासूनच अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात प्रथम एक्झामर लेझर आपल्या रुग्णालयात दाखल केले होते."डॉ श्रीकांत केळकर यांनी केळकर कुटुंबियांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली.
कार्यक्रमात या वेळी डॉ. संचेती, डॉ. सचीन पाटील आदींचीही भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. ओस्तवाल यांनी केले.
डॉ. श्रीकांत केळकर यांच्याकडून आय एम ए ला ३५ लाख देणगी
Reviewed by ANN news network
on
६/१६/२०२४ ०५:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: