राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार : चंद्रशेखर बावनकुळे

 

 

मलकापूरच्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

 

मुंबई :  काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवसेनाराष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेलअसा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवककार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री. बावनकुळे बोलत होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला डॉ. अतुल भोसलेमहिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने - कदमप्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरेमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादवमहिला व बालकल्याण माजी सभापती  गितांजली पाटीलमाजी नगरसेविका स्वाती तुपेअनिता यादव तसेच शहाजी पाटीलसमीर तुपेविजय चव्हाणमल्लाप्पा बामणेराजूभय्या मुल्ला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.


यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.  काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या अपप्रचाराचा आणि खोटारडेपणाचा काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनाही कंटाळा आला असून अनेक जण भाजपामध्ये येण्यासाठी उत्सूक आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्तेही भाजपामध्ये येत आहेत. संविधानासमोर नतमस्तक होऊन आपल्या तिस-या कार्यकाळाची सुरुवात करणा-या पंतप्रधान मोदी यांच्या शब्दावर मतदारांचा विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि महायुतीला विजयी करतील असा विश्वास श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला.  


गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारचे कार्य घरोघरी पोहोचवा आणि पुढच्या पाच वर्षांसाठी घालून दिलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी झोकून देऊन काम करा असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. पुढचा विजय आपलाच असून एक परिवार म्हणून सोबत काम करायचे आहे असेही त्यांनी नमूद केले. याचवेळी कराड दक्षिण मधील सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरेलातूर येथील सामाजिक कार्यकर्त्या माया मतेनवी मुंबई येथील सुनिता हिवराळे आणि सतविंदर कौर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार : चंद्रशेखर बावनकुळे राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार : चंद्रशेखर बावनकुळे Reviewed by ANN news network on ६/२६/२०२४ ०३:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".