वारी जवळ आली असतानाच तुकोबांचे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे निधन

 


पिंपरी : पंढरीची वारी अवघ्या  तीन दिवसांवर आली असतानाच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज संभाजीमहाराज मोरे यांचे आज २६ जून रोजी निधन झाल्याने अवघ्या देहुगावावर शोककळा पसरली आहे. निधनसमयी ते ७६ वर्षांचे होते.

संभाजी महाराज तुकोबारायांचे दहावे वंशज होते. आपल्या आयुष्यात त्यांनी देहुसंस्थानचे विश्वस्तपद, पालखीसोहळा प्रमुख पद सांभाळले. तुकोबारायांच्या जीवनकार्याचा प्रचार, प्रसार केला. ते नामांकित प्रवचनकारही होते.

२६ जून रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


वारी जवळ आली असतानाच तुकोबांचे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे निधन वारी जवळ आली असतानाच तुकोबांचे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे निधन Reviewed by ANN news network on ६/२६/२०२४ ०४:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".