अल्पवयीन आरोपी एनसीसी कॅडेट असता तर पुण्यातील घटना घडली नसती : राज्यपाल रमेश बैस

 


मुंबई : पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन आरोपी जर नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) कॅडेट असता तर अशी घटना घडली नसती, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी ३० मे रोजी व्यक्त केले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता.  मुंबईत एनसीसीच्या समारंभात राज्यपाल बैस बोलत होते.

"वैयक्तिकरित्या सांगायचे तर, देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसी सक्तीचे करावे असे मला वाटते. पुण्यातील दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपी जर एनसीसी कॅडेट असता तर हा अपघात झाला नसता. एनसीसीमुळे शिस्त आणि देशभक्तीची भावना  मुलांमध्ये रुजविली जाते, देशासाठी स्वतःला समर्पित करण्याची भावना आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची आहे,” असे राज्यपाल म्हणाले.. भारतीय समाजात संयुक्त कुटुंबाची संस्कृती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.

"ज्या कुटुंबात संस्कृती नाही, ते जास्त काळ टिकू शकत नाही. आपला देश संयुक्त कुटुंबाच्या संस्कृतीसाठी ओळखला जातो, पण, संयुक्त कुटुंबे कमी होत आहेत आणि त्यामुळे अशा घटना वाढत आहेत. संयुक्त कुटुंबात प्रत्येक सदस्य मुलांचे संस्कार आणि सुरक्षितता याबद्दल जागरूक असतो.मुलाला शिस्त लावली, तर तो प्रामाणिक असेल आणि योग्य मार्गावर चालेल आणि चुकीच्या गोष्टीत गुंतणार नाही. म्हणूनच, आपण शाळा-कॉलेजात विद्यार्थ्यामध्ये चांगले संस्कार रुजवले पाहिजेत. त्यासाठी एनसीसी हे चांगले माध्यम आहे असेही राज्यपाल म्हणाले.

१९ मे रोजी रात्री बाईकवरून जात असलेल्या दोन आयटी व्यावसायिकांवर अल्पवयीन मुलाने आपली आलिशान कार घातली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार आरोपीला निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात त्याला आधी जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु नंतर त्याला ५ जूनपर्यंत १४ दिवसांसाठी निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.

खटला चालविताना अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजले जावे यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे पुणे पोलिस आयुक्तांनी यापूर्वी सांगितले होते. तत्पूर्वी, पोलिसांनी पुष्टी केली होती की ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आलिशान कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून दुसऱ्याच्या रक्ताचे नमुने रुग्णालयाच्या डस्टबिनमध्ये फेकले होते.

या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कुटुंबाकडे कारचालक म्हणून नोकरी करणार्‍या व्यक्तीच्या तक्रारीवरून आयपीसी कलम 342,365, 368, 506 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पुणे पोलिस सीपी यांनी सांगितले. आपल्या अल्पवयीन मुलाऐवजी गुन्ह्याची जबाबदारी घेण्यास आरोपीच्या कुटुंबीयांकडून आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप चालकाने यांनी केला होता.

अल्पवयीन आरोपी एनसीसी कॅडेट असता तर पुण्यातील घटना घडली नसती : राज्यपाल रमेश बैस अल्पवयीन आरोपी एनसीसी कॅडेट असता तर पुण्यातील घटना घडली नसती : राज्यपाल रमेश बैस Reviewed by ANN news network on ५/३१/२०२४ ०१:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".