पिंपरी : देहुरोड पोलीसठाण्याच्या हद्दीत १४ मे रोजी आपल्या कॅबमधून प्रवास करणार्या महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या कॅबचालकाला अटक करण्यात देहुरोड पोलिसांना यश आले आहे.
राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
१४ मे रोजी एक महिला आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी कोरेगाव पार्क येथे जाणार होती. त्यासाठी तिने कॅब बुक केली. आरोपी चालवत असलेली कॅब घेऊन तिला नेण्यासाठी आला. मात्र, तिला कोरेगाव पार्क येथे न नेता त्याने देहुरोड परिसरात तिचा विनयभंग केला.याबाबत त्या महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून आरोपी फरार झाला. तो आपली ओळख लपवून पुणे परिसरात वावरत होता. देहुरोड पोलिसांनी कसून तपास करत त्याचा शोध लावला. त्याला अटक केली आणि त्याची कॅब जप्त केली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पी टी खणसे, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्निल साबळे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२४ ०२:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: