कोंढव्यात नोकरी मेळावा व करियर गायडन्स शिबिर

 


असलम बागवान यांच्याकडून आयोजन

पुणे : सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान यांच्या प्रयत्नातून  नोकरी मेळावा ,करियर गायडन्स,महिला गृहउद्योग मार्गदर्शन शिबिर आयोजित  करण्यात आले आहे.दि.२ जुन रोजी हा कार्यक्रम सकाळी १० ते ६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण,कोंढवा खुर्द (पुणे) येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन साफसफाई महिला कर्मचारी आणि सहकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.समाजातील विविध व्यक्तींचे सत्कार केले जाणार आहेत.तसेच नोकरी मेळाव्यातून नाव नोंदणी व मुलाखत घेण्यात येणार आहे.दहावी, बारावी मध्ये ८० टक्के अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार देखील करण्यात येणार आहे,अशी माहिती असलम बागवान यांनी दिली आहे.

बेरोजगारीचे वाढते प्रमाण तसेच शैक्षणिक धोरण तथा करिअर निवडण्यासाठी असणारे योग्य मार्गदर्शन त्याच सोबत आरोग्य ही हे सर्व विषय सामान्य नागरिकांना अतिशय महत्वाचे असल्याने  नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

लाईट हाऊसच्या माध्यमातून मोफत विविध कौशल्ये प्रशिक्षण ऑफिस एक्जेकिटिव्ह,अकाऊंट एक्जेकिटिव्ह, नर्सिंग, ब्यूटि पार्लर, फॅशन डिझायनर, होटेल मॅनेजमेंट इत्यादी नोंदणी करण्यात येणार आहे.५-३० ते ६-३० करीयर गायडन्स भाग १ सिव्हिल सर्व्हिस स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन होणार आहे.यासाठी मार्गदर्शक म्हणून अक्रमुल्ल जब्बार खान  (रीटायर्ड आय. आर.एस) हे असणार आहेत. ६-३० ते ८-०० या दरम्यान दहावी बारावी ग्रेजूयेशन नंतर काय ? यावर आधारीत करीअर मार्गदर्शन हे मार्गदर्शक  संजय साळुंखे हे करणार आहेत.८-०० ते ८-३० या वेळात दहावी, बारावी मध्ये ८० टक्के अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थीचा सत्कार सोहळा घेण्यात येणार आहे.तरी आपण या कार्यक्रमात हजर राहून येथे उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घ्यावा.अशी आवाहन असलम बागवान यांनी केलेले आहे.सामाजिक बांधिलकी विविध प्रश्नांवर असलम बागवान हे आवाज उठवित असतात.तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, तरुण बेकार न रहाता त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या उद्देशाने असलम बागवान यांनी भव्य नोकरी मेळावा व करियर गायडन्स शिबिरा सोबतच लोकांचे आरोग्य हे आरोग्यदायी व्हावे म्हणून आरोग्य शिबीर सुध्दा घेण्यात आले  आहे. 

असलम बागवान हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसेना पार्टीकडून  उभे राहिले होते.त्यांनी तरुणांच्या बेरोजगारीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते.तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार तसेच विविध स्वरूपाची शब्द त्यांच्या वचन नाम्यात सुद्धा लिहिण्यात आले होते.निकाल लागण्यापुर्वीच त्यांनी त्या वचनास पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली असून त्यांनी महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाची आखणी केल्याने त्यांच्या या आयोजना बद्दल लोकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोंढव्यात नोकरी मेळावा व करियर गायडन्स शिबिर कोंढव्यात नोकरी मेळावा व करियर गायडन्स शिबिर Reviewed by ANN news network on ५/२९/२०२४ ०२:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".