नेक्झु मोबिलिटीतर्फे आयपीएल २०२४ मधील सर्वात चमकत्या खेळाडूचा सन्मान; तुषार देशपांडे यांनी जिंकली सर्वांची मने

 


पुणे : नेक्झु मोबिलिटी या नाविन्यपूर्ण शहरी वाहतूक सुविधा पुरवठादार कंपनीने २०२४ च्या संपूर्ण आयपीएल सीझनमध्ये आपल्या लक्षणीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या तुषार देशपांडे यांचा सन्मान केला आहे. नेक्झुने या उद्योन्मुख खेळाडूने केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल स्टायलिश रॉम्पस+ इलेक्ट्रिक सायकल्स भेट दिली आहे.

 

नेक्झु मोबिलिटीचे व्यवसाय प्रमुख श्री. चिंतामणी सरदेसाई म्हणाले, आयपीएलमध्ये तुषार यांनी केलेल्या कामगिरीने नेक्झुमध्ये आम्ही सर्व जण भारावून गेलो आहोत. ते या सीझनमधील सर्वात अनपेक्षित कामगिरी करणारे खेळाडू असून भविष्यातही ते अशीच कामगिरी करण्याची प्रतीक्षा आम्हाला आहे. त्यांना आमची रॉम्पस+ इलेक्ट्रिक सायकल भेट देऊन त्यांची कठोर मेहनत आणि प्रत्येक क्रिकेटप्रेमीला त्यांच्याकडून मिळत असलेल्या प्रेरणेचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्याहीपेक्षा तुषार यांचे व्यक्तिमत्त्व आमच्या ब्रँडच्या विश्वासार्हता, कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करणे व ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांशी सुसंगत आहे.

 

रॉम्पसहे नेक्झुचे स्पोर्टी उत्पादन असून त्यात ५.२Ah लि- आयन बॅटरी बसवण्यात आली आहे. यामुळे तिचा वेग ताशी २५ किमीपर्यंत नेता येतो. कोल्ड रोलेड स्टीलपासून बनवण्यात आलेली ही बाइक पूर्ण चार्ज आणि थ्रॉटल मोडमध्ये ३३ किमी जाते. यामध्ये २६ इंची पंक्चर रेसिस्टन्स नायलॉन ट्युब टायर्स ड्युएल डिस्क ब्रेक्ससह देण्यात आले आहे. रॉम्पस+ मध्ये तीन राइड मोड्स, आरामदायी कुशन सीट्स देण्यात आले आहे, ज्यामुळे राइडदरम्यान भरपूर आराम मिळतो.

 

इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात नेक्झु मोबिलिटी आघाडीवर आहे. कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आमि पर्यावरणपूरक मूल्ये यांचा मिलाफ साधत शहरी वाहतुकीचे चित्र बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीटुबी आणि बीटुसी अशा दोन्ही बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेक्झु मोबिलिटीने तीन ईव्ही सायकल्सची निर्मिती आणि इंजिनियरिंग केले असून त्यात रॉम्पस+, रोडलार्क आणि बझिंगा यांचा समावेश आहे. ही उत्पादने वाजवी किंमतीत उपलब्ध करण्यात आली आहेत. देशांतर्गत विकसित करण्यात आलेली ही उत्पादने ९५ टक्के स्थानिक पातळीवर आणि कंपनीअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या पॉवरट्रेन यंत्रणेसह तयार करण्यात आली आहेत. त्यांचे उत्पादन पुणे येथे करण्यात आले आहे. नेक्झु ईव्ही सायकल्स भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. सायकलिंगची व्याख्या नव्याने तयार करणाऱ्या या सायकल्स शाश्वत वाहतुकीच्या कक्षा रूंदावणाऱ्या आहेत.

नेक्झु मोबिलिटीतर्फे आयपीएल २०२४ मधील सर्वात चमकत्या खेळाडूचा सन्मान; तुषार देशपांडे यांनी जिंकली सर्वांची मने नेक्झु मोबिलिटीतर्फे आयपीएल २०२४ मधील सर्वात चमकत्या खेळाडूचा सन्मान; तुषार देशपांडे यांनी जिंकली सर्वांची मने Reviewed by ANN news network on ५/२९/२०२४ ०३:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".