पुणे : कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्तचाचणी अहवाल बदलण्याच्या प्रकरणात अटकेत असलेले डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हाळनोर आणि वॉर्डबॉय अतुल घटकांबळे या अटकेत असलेल्या तिघांना निलंबित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
याबाबत ससूनचे डीन विनायक काळे म्हणाले, तावरे यांच्याकडे असलेला विभागप्रमुखाचा कार्यभार काढून घेण्यात आला असून तो डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.तावरे आणि हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलमेही लावण्यात आल्याने आता त्या खात्याकडूनही या तिघांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान तावरे याने आपण सर्वांची नावे सांगणार असे म्हटल्याने या प्रकरणाशी संबंधित सर्वांचे धाबे दणाणले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२४ ०५:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: