पुणे : महाराष्ट्रातून उत्तरभारतात जाणार्या येणार्या प्रवाशांची वाढती लक्षात घेऊन रेल्वेने अनेक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार पुणे-दानापूर-पुणे विशेष गाडी चालविली जाणार आहे.यापूर्वी ही गाडी अनारक्षित म्हणून सूचित करण्यात आली होती. अशी माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
या गाडीबद्दल अधिक तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक 01415 पुणे-दानापूर उन्हाळी विशेष दिनांक 24.4.2024 आणि 28.4.2024 रोजी पुण्याहून19.55 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दानापूरला 04.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01416 दानापूर-पुणे उन्हाळी विशेष दिनांक 22.04.2024, 26.4.2024 आणि 30.4.2024 रोजी दानापूर येथून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
सुधारित रचना: एकूण 22 ICF कोच:- 14 स्लीपर क्लास (आरक्षित) + 6 स्लीपर क्लास (अनारक्षित) + 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 01415 साठी बुकिंग दिनांक 22.04.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या सविस्तर थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि गाड्यांच्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: