पुणे : 'मनीषा नृत्यालय'च्या वतीने आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त दि.२९ एप्रिल रोजी 'अनुवेध ' या कथक नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांच्या शिष्या आपापल्या विद्यार्थीनींसमवेत नृत्य सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.ज्येष्ठ लेखक आणि कला समीक्षक आशीष मोहन खोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शांभवी दांडेकर,शिल्पा दातार,मंजिरी कारुळकर,पद्मश्री जोशी,पूर्वा शाह,मानसी गदो ,तेजस्विनी साठे, माधुरी आपटे,गौरी स्वकुळ,ईशा काथवटे,अदिती कुलकर्णी,पायल गोखले,वल्लरी आपटे,मिथिला भिडे,मधुरा आफळे या कार्यक्रमात नृत्य सादर करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त दि.२९ एप्रिल रोजी 'अनुवेध'
Reviewed by ANN news network
on
४/२६/२०२४ १०:३४:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/२६/२०२४ १०:३४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: