मकोका गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

 




भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात दाखल गुन्ह्यात वर्षभर फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भारती विद्यापीठ पोलीसठाण्याला यश आले आहे.

अजित ऊर्फ जोजो जगदीश शेट्टी, वय २३ वर्षे, रा. राजे चौक, रिगल बेकरी जवळ, चव्हाण कॉम्पलेक्स शेजारील बैठेचाळीमध्ये, मोहननगर, पुणे असे या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात १९/२०२३ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०७,३२३,१४३, १४४,१४७,१४८, १४९ आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)सह १३५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४)अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून तो गेले वर्षभर फरार होता.पोलीस त्याचा शोध घेत होते.

अखेरीस हा आरोपी वारजे पोस्टऑफीस जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. आणि, पुढील कारवाईसाठी या गुन्ह्याचा तपास करणार्‍या सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ २स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. पाटील, निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, पथकाचे अधिकारी सहायक निरीक्षक समीर कदम, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सतिश मोरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, विक्रम सावंत, राहुल तांबे यांनी केली.

मकोका गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंद मकोका गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on ४/२५/२०२४ १०:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".