मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
८ ते २२ एप्रिल या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. जवळचे भाडे नाकारणे, गणवेश परिधान न करणे, बॅच न लावणे, रिक्षाची कागदपत्रे जवळ न बाळगणे आदी प्रकरणी या मोहिमेमध्ये ५२ हजार १८९ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये भाडे नाकारणार्या ३२ हजार ६५८, विनागणवेश रिक्षा चालविणार्या ५ हजार २६८, जादा प्रवासी वाहतूक करणार्या ८ हजार ६५० आणि इतर कारणांसाठी ५ हजार ६१३ चालकांवर कारवाई करण्यात आली. भाडे नाकारणार्या ३२ हजार ५६८ रिक्षाचालकांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई पोलिसांची खास मोहीम
Reviewed by ANN news network
on
४/२६/२०२४ ०९:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/२६/२०२४ ०९:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: