खोपोलीच्या के एम सी महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेहसंमेलन उत्साहात

 


बाबू डिसोजा कुमठेकर

खोपोली :  के. टी. एस. पी. मंडळाचे के. एम. सी. महाविद्यालय तृतीय वर्ष कला शाखा सन १९८४-८५ या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच  स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. अडतीस  वर्षानंतर महाविद्यालयात  एकत्र आल्याने विद्यार्थ्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.


  सकाळपासून सर्व वर्गमित्र, मैत्रीणी ,  वेगवेगळया ठिकाणाहून वर्गमित्र आले होते. या स्नेहसंमेलना करिता प्राचार्य युवराज महाजन ,  विद्यमान प्राचार्य - प्रताप पाटील , उपाध्यक्ष - दिलीप पोरवाल ,  उपप्राचार्य -  आण्णासाहेब साहेब कोरे ,  कार्यालय अधीक्षक- सौ.गीता नाईक , लॅब असिस्टंट- बाळकृष्ण कालेकर ( महाराज) आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.


सुरुवातीला सर्वांनी एकत्र आल्यानंतर  चहा, नाष्टा करून कॉलेजच्या इमारतींना भेटी दिल्या. नंतर हास्य -विनोद करत गीत गात, तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव कथन  करत सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.


जिव्हाळा ग्रुपची आठवण रहावी म्हणून एक वडाचे झाड लावण्यात आले  महाविद्यालयाला भेट वस्तू  देऊन दिवसभर उत्साही वातावरणात आनंद देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे आनंदाची शिदोरी बांधून संपन्न झाला.


के एम सी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस भोसले सर यांच्या आठवणीने अनेकदा सभागृह भावनिक झाले.
स्नेह संमेलन यशस्वी करण्याकरिता जिव्हाळा ग्रुपचे  संयोजक दिनकर भुजबळ , अनिल आंग्रे यांनी व सर्व मित्रांनी मेहनत घेतली.उपस्थित मान्यवरांनी स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

खोपोलीच्या के एम सी महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेहसंमेलन उत्साहात खोपोलीच्या के एम सी महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेहसंमेलन  उत्साहात Reviewed by ANN news network on ४/०४/२०२४ ०९:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".