लोणावळ्यानजिकच्या ब्ल्यू फिल्म शुटींग प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर


वडगाव मावळ : लोणावळ्यानजिक पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या बंगल्यात ब्ल्यू फिल्मचे शूटींग करत असलेल्या १५ जणांसह बंगला भाड्याने देणार्या जणांना २९ मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पाटण गावाच्या हद्दीतील 'अर्णव व्हिला' या बंगल्यावर छापा घालून पाच महिलांसह विष्णु मुन्नासाहब साओ (वय ३०, रा. कोलकत्ता), समीर मेहताब आलम (वय २६), जावेद हबीबुल्ला खान (वय ३५, दोघेही रा.उत्तरप्रदेश), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय २९, रा. चंद्रपुर), अनुप मिथीलेश चौबे (वय २९, रा. मुंबई), मनीष हिरामण चौधरी (वय २०), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१, दोघेही रा. हरियाणा), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८, रा. ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९, गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१, रा. डेहराडुन), यांच्यासह त्यांना बंगला भाड्याने देणार्या सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२) आकेश गौतम शिंदे (वय ३२), सनी विलास शेडगे नि (वय ३५, सर्व रा. मळवली) यांना ताब्यात घेतले होते.

यातील आरोपींवर या सर्वांवर भारतीय दंडविधान कलम २९२,२९३,३४., माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कायदा कलम ६७,६७ (), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपण अधिनियम १९८६ कायदा कलम ,,, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई निरीक्षक किशोर धुमाळ उपनिरीक्षक भारत भोसले, सागर अरगडे,सहायक उपनिरीक्षक अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, युवराज बनसोडे, हवालदार बाळकृष्ण भोईर, दुर्गा जाधव, पुष्पा घुगे, नाईक रुपाली पोहीनकर, कॉन्स्टेबल सागर धनवे, सूरज गायकवाड यांनी केली होती.

या प्रकारामुळे लोणावळा परिसरात एकच खळबळ माजली होती.या प्रकारानंतर ब्ल्यूफिल्म निर्मितीचे केंद्र म्हणून या परिसराकडे पाहिले जात आहे.

यातील आरोपी क्रमांक ते १० यांच्यावतीने वडगाव मावळ न्यायालयात ॲड. अनिकेत जांभुळकर ॲड. हर्षद देशमुख यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला आहे.

 

लोणावळ्यानजिकच्या ब्ल्यू फिल्म शुटींग प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर लोणावळ्यानजिकच्या ब्ल्यू फिल्म शुटींग प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर Reviewed by ANN news network on ४/०४/२०२४ ०८:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".