दिलीप शिंदे
सोयगाव : नवस फेडण्यासाठी बारा गाड्या ओढण्याचा परंपरा असलेला शहराचे ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहिरोबा ( भैरवनाथ ) महाराजांची यात्रोत्सव मंगळवारी उत्साहात पार पडली.पारंपारिक वगदा वगदी मिरवणूक बारागाड्या व डाळ बट्टीचा नवस फेडून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
सोयगाव पळसखेडा रोडवर लोण्याचा बहिरोबा हे प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे.वर्षभर येथे भाविक येतात परंतु चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे यात्रा भरते.मंगळवारी (दि २३) रोजी सकाळी आठ पारंपारिक पद्धतीने वगदा वगदी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.ज्यांनी नवस कबूल केला आहे त्यांनी बारा गाड्या ओढून नवस फेडण्याची या यात्रोत्सव मधील परंपरा आहे त्यामुळे दुपारी बारा गाड्या ओढण्याची परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.खान्देश,मराठवाडा व विदर्भातील हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,रवींद्र काळे,राजू अहिरे,राजेंद्र जावळे यांनी दर्शनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे संस्थानाच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार केला. कमिटीचे सदस्य व स्वयंसेवकानी योग्य नियोजन केल्याने भाविकांनी रांगेत दर्शन घेतले.
डाळ बट्टीच्या महाप्रसादाने यात्रोत्सव साजरा होतो त्यामुळे मंगळवारी यात्रोत्सवात डाळ बट्टीचा सर्वत्र नेम होता.
बारा गाड्या ओढत नवस फेडून सोयगाव शहरातील यात्रोत्सव साजरा, हजारो भाविकांनी घेतले दर्शन...
Reviewed by ANN news network
on
४/२३/२०२४ १०:१३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/२३/२०२४ १०:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: