उरण : 'बहराई फाउंडेशन' या पर्यावरण व निसर्गप्रेमी संस्थेतर्फे उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील इंद्रायणीच्या डोंगरावरील 'श्री एकवीरा देवी'च्या मंदिरापासून अगदी पायथ्या पर्यंत स्वच्छता व याच सोबत तेथील एका रानवाटेवर पाणवठा तयार करण्यात आला.
२२ एप्रिल या जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने, पृथ्वीला हानी पोहोचवत असलेले वाढते प्रदूषण आणि प्लास्टिक वापराचा अतिरेक यावर जनजागृती म्हणून 'स्वच्छता मोहीम' राबविण्यात आले . याचबरोबर सध्याच्या असह्य उष्णतेमुळे माणसाबरोबर वन्यजीवांची होणारी होरपळ लक्षात घेऊन, पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या रानवाटेवर वन्यजीवांना पाण्याची व्यवस्था म्हणून एक कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला. पुढील काही दिवसांत उरणमध्ये आणखीन काही ठिकाणी पक्षांना पाण्याची व्यवस्था म्हणून मातीची भांडी ठेऊन त्यात नियमित पाणी भरण्याची व्यवस्था बहराई कडून करण्यात येणार आहे.इंद्रायणी डोंगरावर याआधी दसऱ्याच्या निमित्ताने २४ ऑक्टोबर रोजी देखील 'बहराई' कडून स्वच्छता करण्यात आली होती.
या कार्यक्रमात श्रमदान करण्यासाठी 'बहराई फाउंडेशन'चे सदस्य अंकिता ठाकूर, पूजा वाकळे, अदिती, कांचन, आशिष, रामनाथ पाटील, दौलत, रोशन, कानिष यांसोबत कोषाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सचिव वैभव पाटील व उपाध्यक्ष अंगराज म्हात्रे इत्यादी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
बहराई फाउंडेशनने पर्यावरणपूरक उपक्रम राबवून साजरा केला जागतिक वसुंधरा दिन
Reviewed by ANN news network
on
४/२३/२०२४ १०:०८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/२३/२०२४ १०:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: